नितेश राणें: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महोत्सवाची परंपरा आहे.
⚡सावंतवाडी ता.०६-: आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला महोत्सवांची परंपरा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधु महोत्सवाच्या माध्यमातून अनेक मोठ मोठे कलाकार या जिल्ह्यात आणले. त्याला जनतेने नेहमीच उदंड प्रतिसाद दिला होता. मात्र, अलिकडे काही दिवसांत जिल्ह्यात व कोकणात
‘येड्यांची जत्रा ‘ सुरु होती. या येड्यांच्या जत्रेला प्रतिसाद न मिळाल्याने आमच्याच पंतप्रधानांनी सुरु केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसने ते परत निघून गेले. असा टोला भाजप युवा नेते आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
त्या जत्रेमुळे जिल्ह्यातील बिघडलेले वातावरण या सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवामुळे निवळेल व या महोत्सवाला सिंधुदूर्ग जिल्हावासीय उस्फूर्त प्रतिसाद देतील.
