आमचं सरकार हे लोकाभिमुख सरकार…

मंत्री दिपक केसरकर:पुढच्या काळात सावंतवाडी हे पर्यटनदृष्ट्या आकर्षक शहर असेल..

⚡सावंतवाडी ता.०६-:, सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात घेतले‌. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखं त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणली. आमचं सरकार हे लोकाभिमुख सरकार आहे‌. मराठी भाषा, मराठी संस्कृतीची जपणूक करण्याच काम हे सरकार करत आहे‌‌. हा महोत्सव जिल्ह्याच्या पर्यटनासाठी महत्त्वाचा असून महाराष्ट्रातील उत्कृष्ट शहर म्हणून सावंतवाडीला जगाच्या नकाशावर न्यायचं आहे. असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.दरम्यान

पुढच्या काळात सावंतवाडी हे पर्यटनदृष्ट्या आकर्षक शहर असेल.येथील ऐतिहासिक मोती तलावात दुबईच्या धर्तीवर फाऊंटन होईल. येणाऱ्या सहा महिन्यांत जिल्ह्याचा कायापालट झालेला असेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page