मंत्री दीपक केसरकर: उद्धव ठाकरेंना गांधी चौकात सभा घ्यावी लागते हे दुर्दैव..
⚡सावंतवाडी ता.०६-: उद्धव ठाकरे हे माझ्यासारख्या सज्जन माणसाच्या अंगावर जात असतील तर हे येथील जनता कधीच सहन करणार नाही. कोकणातील दौऱ्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन त्यांचा अवमान केला आहे. तुम्ही घेतलेले निर्णय शरद पवार यांच्या सांगण्यावरून घेतले. त्यामुळे तुमच्यावर ही पाळी आली आहे, अशी टीका शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान माझा पक्ष प्रवेश हा जिमखाना मैदानावर झाला होता तेव्हा तोबा गर्दी झाली असताना आता तुम्हाला गांधी चौकात सभा घ्यावी लागते हे दुर्दैव आहे. एवढंच होत तर जिमखाना मैदानावर सभा घ्यायला हवी होती गांधी चौकात का घेतली असा सवाल ही मंत्री दिपक केसरकर यांनी उपस्थित केला.
केसरकर पुढे म्हणाले, नारायण राणे हे सिंधुदुर्ग वासियांसाठी देव होते त्यावेळी तुमच्या गाडीत भरायला पेट्रोल आणि राहण्यासाठी हॉटेल मिळत नव्हते तर श्याम सावंत सोडले तर त्यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार त्यांनी पुन्हा निवडून आणले आणि त्यांच्यावर तुम्ही टीका करता हे चूक असल्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले. माझी लढाई नारायण राणे यांच्याशी व्यक्तिगत नव्हती आता या लढाईमध्ये व्यक्तिगत लढाई नसल्यामुळे आमचे दोघांचे एकमेकांशी जुळले आहे असे केसरकर बोलताना म्हणाले. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाचा मान महाराष्ट्राला मिळाला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मानही जिल्ह्याला मिळाला असून यासाठी सावंतवाडी शहरामध्ये 800 प्रतिनिधी आणि विद्यार्थी येणार असल्याचे ते म्हणाले यासाठी स्टॉल्स उभारले असून विज्ञानात विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बालभारतीला पंचवीस लाख रुपये तर राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी एक कोटी रुपये दिले असून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ते म्हणाले लवकरच सावंतवाडी शहरांमध्ये क्रीडा संकुल आणि रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम उभारण्यात येणार असून क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपये देण्यात आले आहेत त्याचबरोबर सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी 55 कोटी रुपये आणि माजगाव व उडेल येथील धरणाकरिता ९० कोटी रुपये देण्यात आले असून या धरण प्रकल्पामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे या सर्व कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले
दरम्यान मंत्री केसरकर पुढे म्हणाले की आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री असताना पाणबुडीसाठी निधी देऊ शकले नाहीत. मेडिकल कॉलेजचे श्रेय तुम्ही घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण ते आधीच मंजूर झाले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या मतदारसंघात हजारो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प आणला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच मी देखील या जिल्ह्यासाठी करोडो रुपयांचा निधी आणला आहे. तुम्ही कोकणात येऊन केवळ टीका टिप्पणी व टोमणेबाजी करण्याचे काम करता तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा तुमचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे मंत्री असताना या जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपया तरी दिला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
