आरटीओ, डंपर चालक वाद विकोपाला

आरटीओ पथकाची सुरक्षेसाठी सावंतवाडी पोलिसांत धाव

सावंतवाडी-: मळगाव बायपास वर थांबलेल्या कोल्हापूर येथील आरटीओ पथकाने पुन्हा एकदा डंपर चालकावर कारवाई केल्याने आरटीओ पथक आणि डंपर चालक मालक संघटनेत वाद झाला असून, या वादानंतर आरटीओ पथकाने सावंतवाडी पोलिस स्थानक गाठत पोलिस संरक्षणाची मागणी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे केली आहे. यावेळी होत असलेली कारवाई चुकीची असल्याचे सांगत दत्तप्रसाद डंपर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गावकर हे आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी कारवाई करायची असल्यास सर्व अनधिकृत व्यवसायांवर करावी फक्त डंपर चालकांना लक्ष करू नये. असे पुन्हा घडल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यात आरटीओ पथक असताना बाहेरून पथक आणून कारवाई केली जाते असा प्रश्न जितेंद्र गावकर यांनी उपस्थित केला आहे.

You cannot copy content of this page