*💫सिंधुदुर्गनगरी दि.१९-:* महिला व बाल विकास आयुक्तालयाने बाल न्याय मुलांची काळाजी व संरक्षण अधिनियम 2015 व महाराष्ट्र नियम 2016 मधील तरतुदीनुसार बाल कल्याण समिती सिंधुदुर्ग येथे अध्यक्ष व 4 सदस्य पदांसाठी व बाल न्याय मंडळ सिंधुदुर्ग येथे 2 सदस्य पदासाठी विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून नामांकने मागविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 10 मार्च 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसाच्य आत संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयाकडे सादर करणेबाबतचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने दिनांक 10 मार्च 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द झालेली असून विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी दिनांक 24 मार्च 2021 पर्यत आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सादर करावेत असे आवाहन व्ही.सी.म्हात्रे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ सदस्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
