हळवल फाटा येथे टाटा ट्रक पलटी होऊन भीषण अपघात…

4 टूव्हीलर ट्रकखाली चिरडल्या ; शेडचे काम करणाऱ्या कामगारांना दुखापत

ट्रक मधील चालकासह दोघांना किरकोळ दुखापत ; सुदैवाने जीवित हानी टळली

*💫कणकवली दि.१९-:-:* महामार्गावर गडनदीपुला नजीक हळवल फाटा येथे लोखंडी व लाकडी साहित्य घेवून दिल्लीहून गोव्याच्या दिशेने जाणारा टाटा ट्रक वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला.सुदैवाने जीवित हानी टळली तरी अंदाजे 4 टूव्हीलर गाड्या या ट्रकखाली चिरडल्या गेल्या.तसेच हायवे लगत पत्रा शेडचे काम चालू असल्याने या ठिकाणी वेलडिंगचे काम करणाऱ्या दोन कामगारांना दुखापत झाली तसेच ट्रक मधील चालकासह दोघांना किरकोळ दुखापत झाली.अपघाता ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी जमली होती. या अपघातात चालक हर्षद खान(रा.राजस्थान) क्लिनर रजाक खान (राजस्थान), अपघातस्थळी काम करणारे अजय नरहरी शिंदे ( वय 47 रा. गोठणे),ओंकार भास्कर कदम वय ( 22 रा.कणकवली) आदी जखमी झाले असून त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी संकेत नाईक,महेश सावंत,अण्णा कोदे, नितीन म्हापणकर,विलास गावकर,भास्कर राणे,आदींनी मदत कार्य केले. महामार्गावरील हळवल पुलानजीक या वळणावर अनेक लहान मोठी दुकाने उभारण्यात आली आहेत.पुलावरून गाडी येत असताना या ठिकाणी असलेले धोकादायक वळण अपघाताला निमंत्रण ठरेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.या घटनेने ही शक्यता खरी ठरली. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हा ट्रक ज्या ठिकाणी वेल्डिंगचे काम सुरू होते त्या ठिकाणी पलटी झाल्याने दुकान व्यावसायिकांचा धोका टळला अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती त्यामुळे भविष्यत या वळणा बाबत विचार करण्याची आली आहे.

You cannot copy content of this page