आज पासून झालं प्रारंभ; संजू परब यांनी केले मार्गदर्शन..
⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी तालुक्यात गाव चलो अभियानाला आजपासून सुरुवात झाली असून माजगांव बुथ क्रमांक 156 वर अभियानाचे प्रमुख संजू परब यांच्या यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना संजू परब यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावातील लोकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी सरपंच अर्चना सावंत, बुथ अध्यक्ष रामदास भोगण, सचिन बिर्जे, अजय सावंत, रिचर्ड डिमेलो आणि ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
