उद्धव ठाकरे यांचा केसरकारांना टोला: येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीतील घाण साफ करायची आहे..
⚡सावंतवाडी ता.०४-:* इथला डबल गद्दार, हा कलंक ते पुसू शकत नाही. दर आठवड्याला शिर्डीला जाणारा, श्रद्धा-सबुरी मानणारा माणूस वाटला होता. तांदळाचा किस्सा भास्कर जाधवांनी सांगितला. गद्दारी नसानसात भिनलेला गद्दारच रहाणार असा टोला त्यांनी दीपक केसरकर यांच नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी लगावला.
विनायक राऊतना निवडून दिलत म्हणून कोकण आज वाचल. एक वळवळ आहे ती पण साफ करून टाका. लादी चकचकीत केली तशी झाडू घेऊन सगळी घाण साफ करायची आहे. सावंतवाडीतही करायची आहे. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी ती केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत देखील ती आपणास करायची आहे. गणपत गायकवाडांनी का गोळीबार केला ? हे समोर आलं पाहिजे. मिंदेंमुळे गुंडांची पैदास होईल असं त्यांचं मत आहे. त्यांची बाजू घेणार नाही पण वस्तुस्थिती कळली पाहिजे. गणपत गायकवाडांनी कबुली ही दिलेली आहे. त्यामुळे आता पाहू मोदी गॅरंटी कुणाला पावते असंही ते म्हणाले.
यावेळी खासदार विनायक राऊत,आ. भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आ. रमेश कोरगांवकर, दत्ता दळवी, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, वरूण सरदेसाई, मिलींद नार्वेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, सतिश सावंत, संजय पडते, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, बाळा गावडे, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.
