भाजपच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करावे…

कणकवली विभाग नियंत्रक कार्यालयात मनाई मोडत केला जमाव; नगरसेवक कन्हैया पारकर यांची मागणी

*💫कणकवली दि.१९-:* जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले असताना देखील भाजप कार्यकर्त्यांनी नियंत्रण अधिकारी यांच्या कार्यालयात जमाव करून जात मनाई आदेशाचे उल्लघन केल्याप्रकरणी संदीप मेस्त्री, रुपेश कानडे, शहर अध्यक्ष अण्णा कोंदे, नगरसेविका मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, प्राची करपे, मिलिंद मेस्त्री, नितीन पाडावे, सागर राणे, सुभाष मालडकर, आनंद घाडी, आनंद बादल, गणेश तळगावकर, विजय इंगळे, पप्पू पुजारे तसेच अन्य १५ ते २० लोक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. यात त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करत त्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यासाठी पोलिसाशी हुज्जत घातली असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page