खुर्ची टिकण्यासाठी केसरकरांची ठाकरेंवर टिका…

विनायक राऊत; उगाच आमच्या आड येऊ नका ; लोकसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय घसरण सुरु..

सावंतवाडी ता.०२-: आपली खुर्ची टिकावी यासाठी दीपक केसरकर उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे,उगाच आमच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका लोकसभेच्या निवडणुकीनंतर तुमची राजकीय घसरण सुरू होईल अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.


तर विकासाच्या फायलीवर वर कसं बसायचं हे केसरकरांन कडूनच शिकावं त्यामुळे आम्ही नुसती सभा नव्हे तर या सभेतून विजयाचा निर्धार करणार असल्याचे ते म्हणाले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चार रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांची सावंतवाडी येथे सभा होणार असल्याने खासदार विनायक राऊत यांनी सभेची स्थाळाची पाहणी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीत रविवारी होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर पाहणे करण्यासाठी ते आज गांधी चौकात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख संजय पडते जिल्हा समन्वयक बाळा गावडे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब तालुकाप्रमुख रुपेश राऊळ रुची राऊत गितेश राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावरून केसरकर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत परंतु मल्टीस्पेशालिटी तसेच अन्य प्रकल्प लक्षात घेता विकासाच्या फायलीवर कसे बसायचे हे दीपक केसरकरांकडूनच शिकावं.
एकीकडे ज्या नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये यासाठी दिल्लीमध्ये आकांतांडव केले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं कारण हे महाविद्यालय झाल्यास आपल्या खाजगी हॉस्पिटलला त्याचा फटका बसेल त्यामागचे कारण होते परंतु आज विकासाच्या बाता करणारे केसरकर त्यांची दलाली करायला निघाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिलं असे म्हणण्यापेक्षा जे काही दिल ते तुम्हाला आयुष्यभर ही देता येणार नाही.
.

You cannot copy content of this page