दोडामार्ग तालुक्यातील बंद एसटी फेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात…

ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत केली मागणी: लवकरच बैठक घेऊन निर्णय घेऊ; अगरप्रमुखांचे आश्वासन..

⚡दोडामार्ग ता.०२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग च्या वतीने सावंतवाडी एस टी आगार प्रमुख निलेश गावित तसेच शेवाळे यांची भेट घेऊन तालुक्यातील बंद एसटी फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी,उपतालुका संघटक संदेश वरक, महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस, सुनील गवस,दीपक जाधव, बाबा खतीब व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी दोडामार्ग डेपोतून वेळेत न सुटणाऱ्या एसटी बस तसेच विर्डी,पिकुळे,मांगेली,पाळये,सोनावल ह्या एस टी फेऱ्या बंद केलेल्या त्वरित चालू करण्याबाबत, तसेच सावंतवाडी पाळये या वस्तीच्या बस च्या चालक व वाहक यांच्या संडास बाथरूम ची सोय नसल्याने पाळये गावात वस्थीची बस येत नाही ती मेढे ग्रामपंचायत येथे थांबते ती बस तात्पुरती सावंतवाडी पाळये व्हाया मेढे अशी करावी अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करून एसटी पाळये गावात सरू करतो असे आश्वासन आगार व्यवस्थापक यांनी दिले. तसेच वरील बस संदर्भात आठ दिवसात शिवसेना पदाधिकारी व एसटी मॅनेजमेंट यांची मिटिंग लावून निर्णय घेऊ असे आश्वासन आगार व्यवस्थापक यांनी दिले.

You cannot copy content of this page