जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

⚡ओरोस ता.३१-: जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी सायंकाळी करण्यात आल्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत
बदल्या झालेले सहाय्यक निरीक्षक याप्रमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची बांदा पोलीस ठाण्यातून प्रभारी अधिकारी सागरी सुरक्षा शाखा सिंधुदुर्ग, अनिल व्हटकर यांची आचऱ्यावरून सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग, बळीराम सुतार यांची मालवण पोलीस ठाण्यावरून वेंगुर्ला पोलीस ठाणे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांची वेंगुर्ले पोलीस ठाण्यावरून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्ग, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक या ठिकाणावरून बांदा पोलीस ठाणे, सुनील जाधव यांची मालवण पोलीस ठाण्यातून आचरा पोलीस ठाण्यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद सूर्यवंशी यांची कुडाळवरून अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून बदली झाली आहे.

सिंधुदुर्गात ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक दाखल
कोकण परीक्षेत्रातील २६ सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या बदल्या झालेल्या आहेतयामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा बदल्या परजिल्ह्यात झाल्या आहेत तर तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत.यामध्येसहाय्यक पोलिस निरीक्षकभीमसेन गायकवाड पालघर वरून सिंधुदुर्गअसिफ बेग पालघर वरून सिंधुदुर्गशेखर लव्हे रायगड वरून सिंधुदुर्गमध्ये बदली करण्यात आली आहेतर सहाय्यक पोलिस निरीक्षखतौसिफ सय्यद, स्वाती यादव , सागर खंडागळे, भारत फाणे यांचीसिंधुदुर्ग वरून रायगड मध्येबदली झाली आहे.कोकण परीक्षेत्राचेविशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यानी मंगळवारी या बदल्याचे आदेश काढले

You cannot copy content of this page