अनिल केसरकर यांचा आरोप:काम तात्काळ थांबविण्याची केली मागणी…
⚡सावंतवाडी ता.३०-: सावंतवाडी जिमखाना मैदानच्या ड्रेसिंगरूमचे सुमारे ९० ते ९५ लाख रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेले काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी केला.दरम्यान या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नाही. चालू असलेले काम धोकादायक असून अतिशय दर्जाहीन पद्धतीने चालू आहे. सदर काम तात्काळ थांबविण्यात यावे व ठेकेदाराला तात्काळ नोटीस काढण्यात यावी अन्यथा हे काम आम्ही बंद करू असा इशारा जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिला आहे.
