⚡कुडाळ ता.२९-: शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख म्हणून अरविंद करलकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी अरविंद करलकर यांना सुपूर्द करण्यात आले.
तसेच शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख आशा वळप्पी तसेच कुडाळ महिला आघाडी तालुकाप्रमुख दीक्षा सावंत यांनाही जबाबदारी देण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रिया टेमकर, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख नंदिनी पराडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, विश्वास गावकर, मालवण तालुकाप्रमुख महेश राणे, शिवसेना खजिनदार भास्कर राणे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी शिवसेना विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
