भाजपकडून आयोजित हळदी कुंकू व खेळ पैठणीच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य: खेळ पैठणीच्या स्पर्धेमध्ये अमृता वेंगुर्लेकर प्रथम..

⚡सावंतवाडी ता.२५-: अयोध्येतील श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सावंतवाडीतील भोसले उद्यान मध्ये भाजपच्या मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने महिला मोर्चा सावंतवाडी शहर मंडळ कडून
महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी खेळ पैठणीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ची पैठणी अमृता वेंगुर्लेकर यांना मिळवली तर द्वितीय क्रमांकाची साडी प्राजक्ता बांदेकर ,तर तृतीय क्रमांकाची साडी संचिता केनवडेकर यांना मिळाली यावेळी उपस्थितांकडून त्यांच अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान सामाजिक कार्यातील महिला ,उद्योजिका ,शिक्षण क्षेत्रातील महिला यांचा सत्कार करण्यात आला असून यामध्ये डॉक्टर प्रणाली गोलगाटे , रेडीज ,सरिता फडणीस ,रेखा कुमठेकर ,शारदा गुरव ,मेघना राऊळ ,माजी सरपंच सुप्रिया मडगावकर ,दळवी ,मनीषा नवांगुळ ,कल्पना बांदेकर या सर्वांचा सत्कार करण्यात आला ..

तसेच हरे कृष्णा संघटनेकडून आरती करण्यात आली आणि फुगड्या करण्यात आल्या असून यावेळी फटाक्यांची देखील आतिषबाजी करून राम लल्लाच्या येण्याचा जल्लोष करण्यात आला.यावेळी जिलेबी वाटप करण्यात आली

या कार्यक्रमाला राजन तेली, संजू परब ,अनिल निरवडेकर ,केतन आजगावकर ,दिलीप भालेकर ,सुधीर आरिवडेकर ,उदय नाईक,रवी मडगावकर ,बंटी पुरोहित ,अमित परब ,अजय सावंत यांनी उपस्थिती दर्शविली तसेच सावंतवाडी महिला मोर्चा यांच्या सहकार्याने राम लल्ला च स्वागत करण्यात आलं .

You cannot copy content of this page