स्थानिक स्वराज्य संस्था ना मिळणाऱ्या निधीच्या कमतरतेवर आमदार नितेश राणेंचा सल्ला
*💫देवगड दि.१८-:* पं.स.सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना माेठ्या प्रमाणात निधी मिळत नसल्यामुळे विकासकामांवर परिणाम हाेत आहे यावेळी आर्थिक नियाेजनासाठी पं.स.लाेकप्रतिनिधी व प्रशासनाने आर्थिक स्त्राेत निर्माण करावेत असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. देवगड पंचायत समिती येथे प्रधानमंत्री आवास याेजना डेमाे हाऊस भुमिपुजन साेहळा व शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण साेहळा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी ते बाेलत हाेते. या कार्यक्रमाला सभापती लक्ष्मण उ\र् रवि पाळेकर, उपसभापती रविंद्र तिर्लाेटकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, भाजपा तालुकाध्यक्ष संताेष किंजवडेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, देवगड नगराध्यक्षा साै.प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, माजी सभापती सुनिल पारकर, माजी उपसभापती डाॅ.अमाेल तेली,जि.प.सदस्या साै.मनस्वी घारे, पं.स.सदस्य सदाशिव ओगले,पुर्वा तावडे, अपुर्वा तावडे, शुभा कदम, निकिता कदम, न.पं.बांधकाम सभापती बापू जुवाटकर, शिक्षण सभापती संजय तारकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर , नगरसेवक, पं.स.सदस्य, भाजपा पदाधिकारी उपस्थित हाेते. यावेळी शिवजयंतीनिमित्त पं.स.च्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध व पाेवाडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना बक्षिस देवून गाैरविण्यात आले.यामध्ये निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक गिरीश अनंत घाडी(जि.प.शाळा पुरळ कसबा), द्वितीय तनिष्का सचिन घुंगरेपाटील(जामसंडे नं.1), तृतीय पियुषा कमलाकर खाेत(कातवण), उत्तेजनार्थ नेहा अमाेल धुरी(कातवण) व अंतरा संदेश गुरव(जि.प.शाळा पांडूरंग स्कूल, \णसगाव),शिवगाण, पाेवाडा स्पर्धा प्रथम स्नेहल सुहास गाेडे(जि.प.शाळा गाेवळ साेमलेवाडी), द्वितीय कल्पेश सुदेश गुरव(साैंदाळे गावठण), तृतीय निश्चय संजय तेली(शाळा जामसंडे नं.1), उत्तेजनार्थ पारस विजय कदम(शाळा कुवळे नं.1) व स्वरांगी सुर्यकांत राघव(पुरळ हुर्शी) यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गाैरव करण्यात आला.यावेळी सभापती लक्ष्मण उ\र् रवी पाळेकर, उपसभापती रविंद्र तिर्लाेटकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार गटशिक्षणाधिकारी पी.एस्. थाेरात यांनी मानले.
