मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची संकल्पना;तेजस्विनी हेल्थ केअर व देवगड तालुका मनसे चे आयोजन
*💫देवगड दि.१८-:* मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी हेल्थकेअर आणि मनसे देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड उमाबाई बर्वे येथील स्नेहसंवर्धक सभागृहामध्ये संपुर्ण शारीरीक तपासणी अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबीर आज संपन्न झाले आहे. या शिबीराचे उद्घाटन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, उपाध्यक्ष महेश नलावडे, सचिव जगदीश जाधव, शहर अध्यक्ष सचिन राणे, विभागीय अध्यक्ष अभिजीत तेली, परेश आडकर, शहर उपाध्यक्ष गणेश सागवेकर, डाॅ.आशिश गावडे, आनंद तावडे, प्रथमेश घाटगे, उमेश नवशे, आदित्य कुटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.
