निराधार अनुदान योजनेच्या बैठकीत ४७ प्रकरणांना मंजूरी

*💫वेंगुर्ला दि.१८-:* वेंगुर्ला येथील निराधार अनुदान योजनेच्या झालेल्य बैठकीत एकूण ४७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. वेंगुर्ला तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनाा समितीची त्रैमासिक बैठक यशवंत परब यांच्या अध्यक्षतेखाली १६ मार्च रोजी तहसिलदार कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तहसिलदार प्रविण लोकरे, विश्वनाथ परब, राजेंद्र कांबळी, मकरंद परब, तुकाराम परब, अरविद बागायतकर, चित्रा कनयाळकर, मनोहर येरम, सुरेश भोसले, निलेश मयेकर आदी उपस्थित होते. या बैठकीत निराधार योजनेच्या ठेवलेल्या प्रकरणांपैकी संजय गांधी अनुदान योजनेची ३०, श्रावणबाळ सेवा राज्य योजनेची ९ व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेची ८ अशा एकूण ४७ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.

You cannot copy content of this page