बिब्याच्या झाडावरुन पडलेल्या इसमाचे निधन

देवगड मूणगे येथे १२ मार्चला घडली होती घटना

*💫देवगड दि.१८-:* बिब्याचा झाडावरील फांदी ताेडत असताना झाडावरून पडून गंभीर दुखापत झालेल्या मुणगे सावंतववाडी येथील सुधीर वसंत राऊत(61) यांचा 17 मार्च राेजी रात्री 10 वा.सुमारास मृत्यु झाला. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सुधीर वसंत राऊत हे दि. 12 मार्च राेजी सकाळी 9 वा.सुमारास बिब्याचा झाडावर चढून ांद्या ताेडत असताना झाडावरून खाली पडले.यावेळी त्यांचा डाेक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी कणकवली येथे नेण्यात आले. तेथे खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू हाेते मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांना घरी आणले हाेते.दि. 17 राेजी रात्री त्यांची प्रकृती अधिक खालावली व त्यांचा मृत्यु झाला. सुधीर वसंत राऊत हे झाडे ताेडणे, लाकूड ताेडणे अशी कामे करून उदरनिर्वाह करीत हाेते.ते भजनीबुवा हाेते.पत्नी, 3 मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे.त्यांचा निधनाने मुणगे परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. देवगड पाेलिस स्थानकात खबर त्यांचा भाऊ किशाेर वसंत राऊत यांनी दिली.यावरून पाेलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद केली असून तपास एएस्आय दशरथ चव्हाण करीत आहेत.

You cannot copy content of this page