उद्धव ठाकरे, राऊत यांचे अयोध्या राम मंदिरसाठी योगदान असल्याचा एकतरी पुरावा द्या…

भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचे आव्हान:देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटत

⚡कणकवली ता.२१-: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर रामभक्त आणि प्रखर हिंदुत्ववादी आहेत,त्यांनी अयोध्येला जाऊन कार सेवा दिली. याचा आम्हाला अभिमान आहे.मात्र सातत्याने राम मंदिरावर टीका करणारे,भाजप नेत्यांवर आणि कार सेवकांवर बोलणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे अयोध्या राम मंदिरसाठी योगदान काय ? उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कार सेवा केल्याचा एक तरी पुरावा द्यावा.असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.

अयोध्येकडे राम मंदिराच्या आंदोलनासाठी तसेच कार सेवेसाठी जात असतानाचा एक फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट केला आहे. त्यातून परत एकदा शिक्कामोर्तब करून दाखवला आहे की, देवेंद्र फडणवीस हे प्रखर राम भक्त आणि प्रखर हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष त्या राम मंदिराच्या आंदोलनामध्ये जिथे बाबरीचा कलंकीत ढाचा कार सेवकांनी तोडून तिथे भव्य अस राम मंदिर उभं केलं आहे, त्याचा फोटो ट्विटर वर पोस्ट केलेला आहे. आम्हाला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की, ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करत आहोत. त्या देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटत आहे. आता जसा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे, तसेच फोटो उद्धव ठाकरे, संजय राऊत हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का ? राम मंदिराच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे स्वतः सहभागी झालेले होते असा एक तरी फोटो,पुरावा दाखवू शकतात काय ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी ते कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान कोणच नाकारत नाही. पिढ्यान – पिढ्या हे कोरल गेलेल आहे की, राम मंदिराच्या आंदोलनामध्ये हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. त्याला कोणीही चॅलेंज किंवा आवाहन करू शकत नाही. शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान सिंहाचा वाटा आहे .शिस्तीत आणि सरळ हा मुद्दा जर समजून घेतला तर हा मुद्दा देखील संजय राऊत यांना व्यवस्थित पद्धतीने समजेल.

ईव्हीएम फ्रॉड २०१४ मध्ये दिसला नाही का? त्यावेळी १८ खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. आता विजयाची शास्वती नसणार म्हणून ईव्हीएम फ्रॉड वाटतात, असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणूकित कुठच्या पक्षाच चिन्ह असत का ? याचा अभ्यास संजय यांनी करावा. मगच ईव्हीएम मशीन बाबत वक्तव्य करावे. ज्यांनी कधी ग्रामपंचायत निवडणूक पण लढवली नाही. त्यांनी पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढवावी मगच दुसऱ्यांवर टीका करावी.असा टोला लगावला.

You cannot copy content of this page