Headlines

अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत विविध कार्यक्रम…

सावंतवाडी शहर व श्रीराम जन्म भूमी उत्सव समितीच्यावतीने बाईक रॅलीचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.१७-: अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर व श्री राम जन्म भूमी उत्सव समितीच्यावतीने २० व २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यनिमित्त शनिवार २० जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता सावंतवाडी शहर बाईक रॅली राजवाडा ते नारायण मंदिर अशी काढण्यात येणार आहे. सोमवार २२ जानेवारी रोजी रात्री ८.०० वाजता दिपोत्सव, सामूहिक रामरक्षा पठण, विजय महामंत्र आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने शहरवासीय तसेच श्रीराम भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम जन्म भूमी उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page