सिंधुदुर्गनगरी ता १७
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती ,सिंधुदुर्ग परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १२ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२४ उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात “रस्ता सुरक्षा अभियान २०२४” राबविण्यात येत असून १८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली व निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षा उद्घाटन समारंभ होणार आहे . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांचीही उपस्थिती राहणार आहे .तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील वाहन चालकानी उपस्थित रहावे. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी केले आहे.
