रजत तोरसकरला राज्यस्तरीय टेबलटेनिस स्पर्धेत रौप्य पदक…

⚡मालवण ता.१७-: टेबल टेनिस खेळाच्या आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्य स्पर्धा नुकत्याच नागपुर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील २२ विद्यापीठांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मालवणचा सुपुत्र कु.रजत तोरसकर व त्याच्या संघाने नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत नागपूर संघाने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश करत रौप्य पदक पटकावले. तर पुणे येथील विद्यापीठ सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.

कु.रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. नुकत्याच झालेल्या भोपाळ येथील टेबल टेनिसच्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धेमध्ये कास्य पदक मिळवले होते, त्यामुळे त्याला खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. रजतच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page