⚡कणकवली ता.१५-: महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या शहरातील कामयाब या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्याला मंत्री तटकरे यांनी उपस्थित राहून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. कार्यकर्ता मेळावा संपन्न झाल्यावर मंत्री तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या निवासस्थानी गेल्या. नाईक कुटुंबियांकडून मंत्री तटकरे यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. नाईक कुटुंबीयांकडून आपुलकीने चहापानाचा आस्वाद घेत मंत्री तटकरे यांनी विविध मुद्द्यांवर चर्चाही केली. विशेषतः राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या सुकन्या इकरा, रिझा, अबीद यांचे बंधू शासकीय ठेकेदार अनिस नाईक यांची कन्या महेक, चिरंजीव अली यांच्याशी मंत्री तटकरे यांनी दिलखुलास वार्तालाप केला. यावेळी अबिद नाईक यांचे वडील अब्दुल नाईक, आई हवाबी नाईक, अबीद नाईक, अनिस नाईक, आसिफ नाईक, हुमेरा नाईक इकरा नाईक रिझा नाईक, महेक नाईक, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर,महिला जिल्हा अध्यक्ष सौ प्रदन्या ताई परब, सौ रिया भाबूरे सौ स्नेहल पाताडे, सौ श्रद्धा गावकर,जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर प्रदेश चिटनीस एम के गावडे,प्रदेश चिटनीस सुरेश गवस,प्रदेश अल्पसंख्यक सचिव शफीक खान,प्रांतिक सदयस्य विलास गावकार,प्रांतिक सदयस्य दिलीप वर्णे तालुका अध्यक्ष राजेंद्र पावस्कर, तालुका अध्यक्ष उदय भोसले,जिल्हा सचिव सतीश पाताड़े असलम ख़ातिब, राजू धारपावर युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, केदार खोत शहर उपाध्यक्ष अमित केतकर,शहर चिटनीस गणेश चौगुले, सचिन अडुळकर सागर जाधव आदी उपस्थित होते.
महिला बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट…
