मळगाव ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन मागे घ्या…

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मळगाव ग्रामस्थांची मागणी:ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून निलंबन घेण्याचे नायर यांनी दिले आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: मळगाव ग्रामविकास अधिकारी शोभा सावंत उर्फ मयुरी बांदेकर यांचे निलंबन मागे घ्या, अशी मागणी मळगाव ग्रामस्थांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून निलंबन मागे घेऊ, असे आश्वासन नायर यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.


यावेळी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ, विलास मळगावकर, गणेशप्रसाद पेडणेकर, गजानन सातार्डेकर, पांडुरंग नाटेकर, गुरुनाथ गावकर, भगवान रेडकर, काळोजी राऊळ, निखिल राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सहदेव राऊळ, हरेश मळगावकर, सिद्धेश आजगावकर, महेश शिरोडकर, सुरज राऊळ, रामचंद्र राऊळ, सागर केरकर, संजय कानसे, भालचंद्र सावंत, मनोहर तेली आदी मळगाव ग्रामस्थ उपस्थित होते. या निवेदनात मळगाव ग्रामस्थांनी असे म्हटले की, मळगाव ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकारी शोभा सावंत यांचे आपणाकडून निलंबन करण्यात आले आहे. मागील वर्षभराच्या कालखंडामध्ये सात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यात आला आहे. त्यामुळे विकासाला कुठेतरी खिळ बसली होती. शोभा सावंत पदावर आल्यावर त्यांनी पूर्णवेळ कामकाज हाती घेऊन मागील बरीचशी ग्रामस्थांची कामे मार्गी लावली आहेत. या गोष्टीचा विचार करून त्यांचे निलंबन रोखणे आवश्यक आहे. मागील १५ व्या वीत्त आयोगाच्या आराखड्यामध्ये बदल करून आपणाकडून मिळाला असून ऑनलाईन अपलोड करणे शक्य नसल्याने १५ व्या वित्त आयोगातील कामे होत नाहीत. त्यामुळे केवळ १५ व्या वित्त आयोगातील निधी खर्ची न घातल्यामुळे त्यांचे निलंबन करणे चुकीचे आहे. या गोष्टीचा विचार करून मळगाव ग्रामविकास अधिकारी शोभा सावंत यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेऊन त्यांना पूर्ववत मळगाव ग्रामविकास अधिकारी म्हणून कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

You cannot copy content of this page