सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यानी सत्कार करीत दिल्या शुभेच्छा..
बांदा/प्रतिनिधी
बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले यांची कुडाळ पोलीस ठाण्यात प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा बांदा पोलीस ठाण्याच्यावतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार केला.
उपनिरीक्षक भोसले हे गेली तीन वर्षे बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी याठिकाणी योग्य पद्धतीने काम करत कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेत. यावेळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी भोसले यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपनिरीक्षक भोसले यांनी आपल्या कार्यकाळात सहकार्य केलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी बांदा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
फोटो :-
बांदा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक समीर भोसले यांचा सत्कार करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
