पणदूर हायस्कूल येथील जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर
⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पणदूरतिठा येथील शिवाजी इंग्लिश स्कूल प्रशालेत संपन्न झालेल्या ५१ व्या जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेतील प्राथमिक गटातील विद्यार्थी प्रतिकृतीमध्येआर पी हायस्कूल सावंतवाडीच्या योगेश जोशी याने सादर केलेल्या ‘सुखदायिनी कचरागाडी’ प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळविला. तर माध्यमिक गटात देवगड तालुक्यातील श्रीमती न शा पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालयचा विद्यार्थी तनिश बिडये यांनी सादर केलेल्या ‘ओझोन स्टरलायझेशन’ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला.
११ व १२ जानेवारी या कालावधीत हे ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेत पार पडले. शुभारंभाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शविली होती. तर शुक्रवारी सायंकाळी समारोप आ वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक गटातील निबंध स्पर्धेमध्ये सिद्धी वारीक-श्रीराम माध्यमिक विद्यालय पडेल देवगड, वेदिका परब-सौ ई द वर्दम हायस्कूल पोईप विरण मालवण, अनुष्का तेली – माध्यमिक विद्यालय माडखोल सावंतवाडी यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. वक्तृत्व स्पर्धेत अस्ती मांजरेकर – आर पी डी हायस्कूल सावंतवाडी, रोशन साळुंखे – टोपीवाला हायस्कूल मालवण, आर्या राणे – शेट मफतलाल हायस्कूल देवगड यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. प्रश्न मंजुषा स्पर्धेत कृष्णा पास्ते, विराज राऊळ – मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी, रोशन साळुंखे आणि उत्कर्ष भिसे अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवण आणि रुद्र गुरव आणि अस्मित मुळीक कळसुली हायस्कूल कणकवली यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती मध्ये रिषम चव्हाण – वामनराव महाडिक विद्यालय तरळे कणकवली यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विद्यार्थी प्रतिकृती मध्ये योगेश जोशी-आर पी हायस्कूल सावंतवाडी यांनी सादर केलेल्या ‘सुखदायिनी कचरागाडी प्रतिकृतीला’ प्रथम क्रमांक मिळविला. दर्शीत खरात – शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा यांनी सादर केलेल्या ‘स्मार्ट होम, स्मार्ट स्कूल’ प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. तर सोहम बिरादार – वामनराव महाडिक विद्यालय तरळे कणकवली यांनी सादर केलेल्या ‘कचऱ्यापासून वीजनिर्मिती’ प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला. प्राथमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील केंद्र शाळा मठ नंबर १ चे शिक्षक गौरव नाईक यांच्या ‘यात्रा गणिताची विभाज्यतेच्या कसोटीची ‘ या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. तर वैभववाडी तालुक्यातील बालभवन विद्यामंदिर मौदे प्रशालाचे शिक्षक संतोष मोहिते यांनी सादर केलेल्या ‘माझा वर्ग माझा खेळ’ या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला आणि दोडामार्ग तालुक्यातील बोडदे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका पूनम खोराटे यांनी सादर केलेल्या ‘गणित शे साहित्य’ या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला.
माध्यमिक गटातील निबंध स्पर्धेमध्ये कुडाळकर हायस्कूलची विद्यार्थिनी सुहानी मोंडकर, टोपीवाला जुनियर कॉलेज मालवणची विद्यार्थिनी गायत्री गावकर आणि विद्यामंदिर माध्यमिक हायस्कूल कणकवलीची विद्यार्थिनी आर्या नाईक साटम यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. तर वक्तृत्व स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवलीचा विद्यार्थी हर्ष जांभळे, एन. ए. एस डी विद्यालय वालावल कुडाळची विद्यार्थिनी समीक्षा फडके आणि टोपीवाला हायस्कूल मालवणची विद्यार्थिनी मुग्धा गवाणकर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत टोपीवाला हायस्कूल मालवणच्या धनश्री शेटये आणि कैवल्य मिसाळ यांनी प्रथम, वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगावच्या विद्यार्थिनी तनवी काणेकर, सिमरन कोरगावकर यांनी द्वितीय तर वेतोरे येथील देवी सातेरी हायस्कूलच्या मयुरी गावडे, कीर्ती कुंभार यांनी तृतीय क्रमांक मिळविला. दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये डॉ दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग मालवणचा विद्यार्थी आतिश राऊळ यांनी सादर केलेल्या ‘धोक्याची सूचना देणारे यंत्र’ या प्रतिकृतीला प्रथम तर कळसुली इंग्लिश स्कूल कणकवली या प्रशालेच्या नितीश पाटकर यांनी सादर केलेल्या ‘सौर रेल्वे’ या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये श्रीमती न शा पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड प्रशालेची विद्यार्थी तनिश बिडये यांनी सादर केलेल्या ‘ओझोन स्टरलायझेशन’ या प्रतिकृतीला प्रथम, प्रगत विद्यामंदिर रामगड मालवणच्या मंजिरी सादये हिने सादर केलेल्या ‘ ऑल इन वन ‘ प्रतिकृती द्वितीय तर माधवराव पवार हायस्कूल कोकिसरे वैभववाडी प्रशालेच्या आयान आरवाडे यांनी सादर केलेल्या ‘स्मार्ट हलमेट’ प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला.
माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य गटामध्ये सेंर्टल इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या शिक्षिका शीतल मांजरेकर यांनी सादर केलेल्या ‘ नेक्स्ट स्टेशन स्पेस मिशन ‘ प्रतिकृतीने प्रथम, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे मालवण प्रशालेच्या विष्णू काणेकर यांनी सादर केलेल्या ‘ मार्ग प्रकाश किरणाचा ‘ प्रतिकृतीने द्वितीय तर माध्यमिक विद्यालय पेंढरी देवगड प्रशालेच्या सत्यपाल लाडगावकर यांनी सादर केलेल्या ‘ अध्ययन सुलभक ‘ प्रतिकृतीने तृतीय क्रमांक मिळविला. तसेच प्रयोगशाळा परिचर साहित्य स्पर्धेत नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ वैभववाडी च्या सहदेव जाधव यांनी सादर केलेल्या ‘ प्रयोगशाळा माझ्या हातात ‘ प्रतिकृतीला प्रथम, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा च्या सूर्यकांत चव्हाण यांनी सादर केलेल्या ‘ प्रायोगिक खेळणी ‘ प्रतिकृतीला द्वितीय आणि शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरतिठा च्या संदीप गवाणकर यांनी सादर केलेल्या ‘ रक्ताभिसरण ‘ प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला.
