*💫सिंधुदुर्गनगरी दि.१७-:* अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरण आरोपीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्ष सक्तमजुरी सह १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तर पोस्को अंतर्गत ३ वर्ष शिक्षा व २ हजार दंड सुनावला आहे. मालवण येथील एका अल्पवयीन मुलीवर चाकुचा धाक दाखवत अत्याचार केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. ही घटना २ मार्च २०१९ रोजी घडली होती. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला आहे. मागील दोन महिन्यात सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद करत ८ जणांना शिक्षा मिळवून दिली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस १० वर्षाची शिक्षा
