आ निरंजन डावखरे: शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू..
⚡सावंतवाडी ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ आहे. त्यामुळे समूह शाळेला आपला विरोध राहणार आहे, असे कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी येथे स्पष्ट केले. ते राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे 51 वे अधिवेशन जिमखाना मैदानावर रविवारी पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, समूह शाळा सुरू झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करायला लागणार आहे. त्यामुळे समूह शाळेला आपला विरोध राहणार आहे. आपण शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
