⚡मालवण ता.०७-: नगर वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने मनाचे श्लोक व श्री गणेश अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा शनिवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण शहर व परिसरातील शाळांसाठी मर्यादित आहे.
यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी मनाचे श्लोक यासाठी ५ ते ७ मिनिटे वेळ मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर इयत्ता पाचवी ते सातवी या गटासाठी श्री गणेश अथर्वशीर्ष पठण यासाठी ५ ते ७ मिनिटे वेळ मर्यादा ठेवण्यात आली आहे. इच्छुक स्पर्धकांनी दि. १७ जानेवारी पर्यंत ग्रंथालयाच्या कार्यालयीन वेळेत नावनोंदणी करावी. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्रेया चव्हाण, नगर वाचन मंदिर सहाय्यक ग्रंथपाल ८३९०६९४३३१ या नंबरवर संपर्क करावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन उदयराव मोरे यांनी केले आहे.
