चिंदर नागोचीवाडी येथील रस्ता कामांचा शुभारंभ…

⚡मालवण ता.०६-: चिंदर नागोचीवाडी येथील अंतर्गत रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणाचा शुभारंभ भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. भौगोलिक दृष्ट्या चिंदर गाव मोठा असून येथील राहिलेल्या रस्त्यांचे कामही टप्प्या टप्याने पुर्ण करु, असे यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले.

या रस्ता काम शुभारंभ प्रसंगी बोलताना चिंदरचे उपसरपंच दीपक सुर्वे यांनी विकसित कामामध्ये स्थानिक नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे सांगितले. तर योगेश पडवळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश क्रांती करीत आहे. ५५० वर्षांची राम मंदिराची प्रतिक्षा संपली असुन येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार असून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात दिवाळी साजरी करावी असे सांगून ते म्हणाले. चिंदर मधील रस्ता कामांसाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचे तसेच यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या चारकोप येथील आमदार योगेश सागर यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.

यावेळी चिंदरचे उपसरपंच दिपक सुर्वे, भाजपा चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ, चिंदर नागोचीवाडी युवक मंडळाचे अध्यक्ष यदुनाथ पडवळ, सतिश नलावडे, रविंद्र पडवळ, अनिल पडवळ, रमाकांत पडवळ, भक्ती पडवळ, तेजश्री पडवळ, सानिका पडवळ, विष्णू पडवळ, परेश पडवळ यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page