⚡कुडाळ ता.०६-: शिवसेना शिवसंपर्क अभियानाचा आढावा बैठक आज शिवसेना रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, महिला आघाडी जिल्हा संघटक वर्षा कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १० हजार लोकांना राजापूर येथील सभास्थळी घेऊन जाण्याचे नियोजन यावेळी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच पक्ष संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख व तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना रवींद्र फाटक यांनी सूचना दिल्या.
शिवसेना शिवसंपर्क अभियानाचा आढावा बैठक संपन्न….
