*⚡सावंतवाडी : *सहदेव राऊळ:* मळगाव येथील हिंदू बांधवांची नियोजन बैठक मळगाव बाजारपेठ येथील हेमंत खानोलकर यांच्या हॉलमध्ये काल शुक्रवारी पार पडली.
अयोध्या या श्रीराम प्रभूंच्या पावन भूमीतून मळगाव गावात मंत्राक्षता आणि निमंत्रण पत्रिका श्री देव मायापूर्वचारी मंदिर येथे आल्या आहेत. या निमंत्रण पत्रिका घरोघरी पोच करण्यासंदर्भात
तसेच २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामाची प्रतिष्ठापना होणार असून त्याच पार्शवभूमीवर दिवशी मळगाव येथे श्रीराम मूर्ती पूजन, रॅली असा कार्यक्रम करण्यासंदर्भात व या कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत श्री देव भूतनाथ मंदिर येथे असलेल्या श्रीरामाच्या पाषाणाजवळ संपूर्ण कार्यक्रम करण्यात यावा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच या दिवशी सकाळी काढण्यात येणारी रॅली डॉ. विजय सावंत यांच्या घराकडून कुंभारवाडी, पिंपळवाडी हनुमान मंदिर, राऊळवस देवळी, श्री देव मायावूर्वचारी मंदिर, झरी जवळ, महापूरूष मंदिर (सर्कल सुतारवाडी), आजगावकरवाडी येथील भागवत भटजी दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, गवंडेवाडी, महापूरुष सावळवाडा, मडवळ टेंब, सोनल सावळ दुकान (समाजमंदिर), देऊळवाडी राष्ट्रोळी देवस्थान, गावकरवाडी, सुधीर भागवत भटजी गणेश मंदिर, ग्रामसचिवालय, मळगाव बाजारपेठ, श्री दत्त मंदिर, तेलकाटावाडी ब्राह्मण स्थळ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातयेवाडी, श्री देव दोन पूर्वस ते भूतनाथ मंदिर अशी रॅली काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सभेच्या शेवटी जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा देण्यात आल्या. या सभेला मोठ्या संख्येने मळगाव येथील हिंदू बांधव उपस्थित होते. २२ जानेवारीला मळगाव येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला मळगाव येथील सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
