सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर..

⚡सावंतवाडी ता.०५-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पाच पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून यामध्ये वैनतेयकार मे.द.शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सागर दत्ताराम चव्हाण यांना जाहीर झाला असून माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्रवीण सगुण मांजरेकर यांना जाहीर झाला आहे तर स्व. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाज सेवक पुरस्कार ग्रामीण पत्रकार निलेश परब यांना तर स्व. बाप्पा धारणकर स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार दिव्या वायंगणकर यांना जाहीर झाला आहे. यावर्षीचा डॉ अजय स्वार यांचे वडील स्व.पांडुरंग स्वार स्मृती प्रित्यर्थ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे हे ठरले आहेत.कै.बंडोपंत भिसे उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मालवण येथील छायाचित्रकार समीर म्हाडगुत यांना जाहीर झाला आहे.
पत्रकार पुरस्काराच्या निवड समितीचे प्रमुख अॅड परिमल नाईक यांनी या पुरस्कारांची घोषणा केली, या समितीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे ,सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर व गतवर्षीचे पुरस्कार विजेते विनायक गावस हे उपस्थित होते
एकूण 63 सदस्य असलेल्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या 19 व्या पत्रकार पुरस्कारांची घोषणा या समितीच्यावतीने एकमताने करण्यात आली निवड झालेल्या पत्रकारांच्या एकूण पत्रकारितेतील कामाच्या निकषावर हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे ॲड परिमल नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले.शेवटी पुरस्कार समितीचे आभार तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी मानले.

You cannot copy content of this page