⚡सावंतवाडी ता.०५-: राणी पार्वतीदेवी हायस्कूल ही प्रतिभासंपन्न भूमी आहे, त्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे देशाचे भाग्यविधाते आहेत . आपल्या पंखाना बळ देण्याचे कार्य या भूमीने केले असे उद्गार राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा श्रीमती अर्चना घारे परब यांनी ‘ताल द रीदम’या कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक म्हणून बोलताना काढले.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष विकासभाई सावंत, सचिव व्ही बी नाईक, खजिनदार सी एल नाईक, शाळा समिती अध्यक्ष दिनेश नागवेकर आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी, माजी शिक्षक तसेच मुख्याध्यापक जगदीश धोंड , उपमुख्याध्यापक पी .एम सावंत, उपप्राचार्या सुमेधा नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते .
ताल द रीदम वार्षिक स्नेहसंमेलनाच उद्घाटन तसेच बक्षिस वितरण, रंगावली प्रदर्शन आणि कला प्रदर्शन याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्या अर्चना घारे परब आणि इतर मान्यवराच्या उपस्थितीत झाले .
यावेळी आरपीडीचा विद्यार्थी सोहम साळगावकर याने सुश्राव्य स्वागतगीत सादर केले . मुख्याध्यापक जगदीश धोंड सर यांनी प्रास्ताविकातून संमेलनामागची आपली भूमिका मांडली. शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक अहवालाचे वाचन उपमुख्याध्यापक मा . पी . एम सावंत सर यांनी केले .
विद्यार्थ्यांतील बौद्धिक आणि कलात्मक विकास व्हावा आणि इतर विद्या र्थ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून पाचवी ते बारावीपर्यंतचे तीन गट पाडून आदर्श विद्यार्थी निवडण्यात आले . पाचवी ते सातवी गटातील आदर्श विद्यार्थीनी कु . तन्वी प्रसाद दळवी, कु . आर्यन प्रणव कासार, आठवी ते दहावीमधून श्रेयस श्रीकात तळवणेकर विद्यार्थिनी पूनम गंगाराम नाईक अकरावी बारावीमधून प्रदीप तुकाराम जंगले, आत्माराम कवठणकर आनंद मांजरेकर, सतोषी भिवा , वैष्णवी गोविंद भांगले, तन्वी तुकाराम सावंत यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले . तसेच कला व क्रिडा क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला .
“मुलींनी शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे . तसेच विदयार्थ्यांनी पोलीस अधिकारी कलेक्टर होण्याची स्वप्न “, असे आवाहन प्रमुख पाहुण्या अर्चनाताई घारे परब यांनी आपल्या व्यासपीठीय भाषणात केले .
” कुठल्या धर्मात जातीत कुणाच्या पोटी जन्माला यावं हे तुमच्या हातात नाही तरी तुम्ही कर्तृत्वाने आपलं भवितव्य उज्वल करू “, असे उद्गार आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा . विकासभाई सावंत यांनी मांडले .
या संमेलनासाठी सावंतवाडी दशक्रोशीतील पालक, शिक्षक, पत्रकार, हितचिंतक आणि शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते . या अभूतपूर्व सोहळ्याचा समारोप उपप्राचार्या प्रा . सुमेधा नाईक यांच्या आभार प्रदर्शनाने करण्यात आला .
