मालवणात मनसेकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध…

⚡मालवण ता.०५-: जितेंद्र आव्हाडांच करायच काय… खाली डोके वर पाय… अशा जोरदार घोषणा देत श्री प्रभू रामचंद्राबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मालवणात मनसे कार्यकर्त्यांनी निषेध करत भरड नाका येथे आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मालवण पोलिसांनी हस्तक्षेप करीत सदरचा पुतळा मनसैनिकांकडून काढून घेत बाजूला केला.

जातीपातीचे राजकारण करून निवडणुका जवळ आल्यावर वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्राला तणावाखाली ठेवायचे काम जितेंद्र आव्हाड आजपर्यंत करत आले आहेत. एखाद्या धर्माला टार्गेट करून त्या धर्माच्या विरोधात बोलून मते कशी मिळवायची हा प्रयत्न आव्हाड हे करत असतात, अशी टीका यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, मनसे तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे, उपतालुकाध्यक्ष पास्कोल रॉड्रीक्स, विशाल ओटवणेकर, लौकिक मेथर, रोहन तावडे, साईश कीर, नितीन राठोड, राज शेलटकर, चिन्मय कुणकवळेकर आदी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page