Headlines

अवैध दारू वाहतूक रोखा, अन्यथा बांदा एक्साईज कार्यालयावर रिकाम्या बाटल्या घेऊन 26 जानेवारीला आंदोलन…

श्रेयस मुंज: अवैध धंदेवाईकांच्या मागे खाकी वर्दीतील कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा देखील केला आरोप…

⚡सावंतवाडी ता.०५-: अवैद्य दारू वाहतूक गोव्यातून राजरोजपणे बांदा तपासणी नाक्यावरून मोठ्या प्रमाणात होत आहे. हे प्रकार तात्काळ बंद करण्यात यावा, अन्यथा 26 जानेवारीला बांदा एक्साईजच्या कार्यालयावर रिकाम्या दारूच्या बाटल्या घेऊन आंदोलन करू असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांनी आज येथे दिला.

दरम्यान काळ्या काचा लावून राजरोजपणे दारूची वाहतूक करणारे अवैध धंदेवाईकांच्या मागे काही खाकी वर्दीतील कर्मचारी असल्याचे देखील माहिती मिळाली असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

You cannot copy content of this page