अँड. अनिल केसरकर:प्रसंगी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरण्याची मनसेची तयारी..
⚡सावंतवाडी ता.०५-: साटेली गावातून गेले काही दिवस बेकायदेशीररीत्या खनिज मालाची वाहतूक चालू असून याचा त्रास गावातील तसेच या मालाची वाहतूक होणाऱ्या मार्गावरील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या मायनिंग विरुध्द मनसे मार्फत या पूर्वी जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले होते.त्यामुळे ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण पाठिंबा असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिली.
दरम्यान गावातील खाण प्रकल्प अतिशय धोकादायक अवस्थेत असल्याबाबतची तसेच या खाण प्रकल्पाची पाहणी करण्यात यावी अशी तक्रार देखील यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी करण्यात आली होती. काही वर्ष बंद अवस्थेत असलेल्या या प्रकल्पामधून बेकायदेशीरपणे दहशत व दादागिरीच्या जोरावर पुन्हा मायनिंग वाहतूक चालू करण्यात आली असून या वाहतूकीविरुध्द ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण पाठिंबा असून प्रसंगी नागरिकांसोबत रस्त्यावर उतरण्याची मनसेची तयारी असल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
