ग्रामस्थ आक्रमक; पोलिस ठाण्यात घातला घेराव..
बांदा/सकाळ वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे अनधिकृत उभारण्यात आलेले स्टॉल राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात हटविले. यावेळी स्टॉल काढण्यासाठी आडकाठी करणाऱ्या स्थानिक युवकला बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी मारहाण केल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. आपण कोणाच्या आदेशाने मारहाण केलीत असा सवाल उपस्थित करत काल सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्याला सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह शेकडो ग्रामस्थांनी घेरावो घालत निरीक्षक काळे यांना जाब विचारला.
शहरात महामार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण असताना याठिकाणीच कारवाई का करण्यात आली असा सवाल उपस्थित केला. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर निरीक्षक काळे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर घेरावो मागे घेण्यात आला.
बांदा-सटमटवाडी येथे येथे सीमा तपासणी नाक्यानजीक स्थानिक युवकांनी दोन दिवसांपूर्वी स्टॉल उभारण्याचे काम सुरु केले होते. यासाठी जेसीबीच्या साहाय्याने जागेची साफसफाई करण्यात आली होती. याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी काल (बुधवार) सायंकाळी उशिरा निनावी नोटीस घटनास्थळावर उभारण्यात आलेल्या गाळ्यांना लावली. आज राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता मुकेश साळुंखे व कनिष्ठ अभियंता वैभव कांबळी हे बांद्यात उड्डाणंपुलाच्या कामासाठी स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी आले होते. स्थानिकांच्या समस्या त्यांनी दुपारपर्यंत ऐकून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी त्यांनी आपला मोर्चा बांदा-सटमटवाडी येथे वळवीला. याठिकाणी सुरु असलेले गाळ्यांचे बांधकाम त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ पाडले. यावेळी पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले.
स्थानिक युवकाला मारहाण
अतिक्रमण काढत असताना स्थानिक युवक न काढण्यासाठी विनंती करत होता. यावेळी पोलीस निरीक्षक शामराव काळे व त्या युवकात शाब्दिक बचाबाची झाली. निरीक्षक काळे यांनी त्या युवकाच्या श्रीमुखात भडकवली. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झालेत.
बांदा पोलीस ठाण्यात धडक
युवकाला मारहाण केल्याने वातावरण तणावाचे झाले. बांदा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी निरीक्षक काळे व उपनिरीक्षक भोसले यांना घेरावो घातला. यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, उपसरपंच जावेद खतीब, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, प्रशांत बांदेकर, आबा धारगळकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सिद्धेश महाजन, सिद्धेश पावसकर, गुरु कल्याणकर, संतोष सावंत, मनसेचे बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर, आनंदबांदा/सकाळ वृत्तसेवा
मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे अनधिकृत उभारण्यात आलेले स्टॉल आज सायंकाळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात हटविले. यावेळी स्टॉल काढण्यासाठी आडकाठी करणाऱ्या स्थानिक युवकला बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी मारहाण केल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. आपण कोणाच्या आदेशाने मारहाण केलीत असा सवाल उपस्थित करत सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्याला शेकडो ग्रामस्थांनी घेरावो घालत निरीक्षक काळे यांना जाब विचारला. शहरात महामार्गावर ठिकठिकाणी अतिक्रमण असताना याठिकाणीच कारवाई का करण्यात आली असा सवाल उपस्थित केला. ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर निरीक्षक काळे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर घेरावो मागे घेण्यात आला.
बांदा-सटमटवाडी येथे येथे सीमा तपासणी नाक्यानजीक स्थानिक युवकांनी दोन दिवसांपूर्वी स्टॉल उभारण्याचे काम सुरु केले होते. यासाठी जेसीबीच्या साहाय्याने जागेची साफसफाई करण्यात आली होती. याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी काल (बुधवार) सायंकाळी उशिरा निनावी नोटीस घटनास्थळावर उभारण्यात आलेल्या गाळ्यांना लावली. आज राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता मुकेश साळुंखे व कनिष्ठ अभियंता वैभव कांबळी हे बांद्यात उड्डाणंपुलाच्या कामासाठी स्थानिकांशी चर्चा करण्यासाठी आले होते. स्थानिकांच्या समस्या त्यांनी दुपारपर्यंत ऐकून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी त्यांनी आपला मोर्चा बांदा-सटमटवाडी येथे वळवीला. याठिकाणी सुरु असलेले गाळ्यांचे बांधकाम त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ पाडले. यावेळी पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यात आले.
स्थानिक युवकाला मारहाण
अतिक्रमण काढत असताना स्थानिक युवक न काढण्यासाठी विनंती करत होता. यावेळी पोलीस निरीक्षक शामराव काळे व त्या युवकात शाब्दिक बचाबाची झाली. निरीक्षक काळे यांनी त्या युवकाच्या श्रीमुखात भडकवली. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झालेत.
बांदा पोलीस ठाण्यात धडक
युवकाला मारहाण केल्याने वातावरण तणावाचे झाले. बांदा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी निरीक्षक काळे व उपनिरीक्षक भोसले यांना घेरावो घातला. यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, उपसरपंच जावेद खतीब, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, प्रशांत बांदेकर, आबा धारगळकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, सिद्धेश महाजन, सिद्धेश पावसकर, गुरु कल्याणकर, संतोष सावंत, मनसेचे बांदा विभाग अध्यक्ष विष्णू वसकर, आनंद वसकर, अक्षय परब, स्वप्नील सावंत, ज्ञानेश्वर सावंत, ज्ञानेश्वर येडवे, बाबा गाड, निलेश सावंत यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण असताना दोन दिवसात उभारलेल्या गाळ्यांवर कारवाई करताना एवढी तत्परता का दाखविली? यामध्ये पोलीस प्रशासनाचा कोणता स्वार्थ आहे? आपण शहरातील इतर अनधिकृत बांधकामे व अनैतिक धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक काळे यांनी आपण केवळ सरकारी काम केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पत्र दिल्यानेच आपण केवळ संरक्षण देण्यासाठी गेलो होतो. यामागे कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. आपण चुकीचे काम केले नाही. तरीही आपल्या भावना दुखावल्या असतील तर आपण जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांनी अनधिकृत बांधकाम संदर्भात उद्या (शुक्रवारी) राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देणार असल्याचे सांगितले. यावेळी अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनासोबत आपण राहणार असल्याचे निरीक्षक काळे यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांचे समाधान झाल्याने घेरावो मागे घेण्यात आला. वसकर, अक्षय परब, स्वप्नील सावंत, ज्ञानेश्वर सावंत, ज्ञानेश्वर येडवे, बाबा गाड, निलेश सावंत यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.