आंबोलीत शिवसेनेची भव्य क्रिकेट स्पर्धेचं थाटात उद्घाटन…

आंबोली,ता.५: येथे शिवसेना( उद्धव ठाकरे)पुरस्कृत भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन आंबोली कामतवाडी येथे चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले. आंबोली शिवसेना (उद्धव ठाकरे) आयोजित क्रिकेट स्पर्धा आजपासून तीन दिवस आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेचे उदघाटन शिवसेना समन्वयक चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपतालुका संघटक आबा सावंत,शब्बीर मणियार,विभाग अध्यक्ष बबन गावडे, ग्रामपंचायत सदस्य काशीराम राऊत,मायकल डिसोजा,विकास गावडे, गुणाजी नाटलेकर,तानाजी गावडे,दादा नाटलेकर,विशाल गावडे, विश्वनाथ गावडे,रूपा गावडे, राजाराम गावडे, सचिन पडवळ,अनिल चव्हाण,संतोष पाताडे,बाळा कोरगावकर,सुनील राऊत,पांडुरंग झोरे,सुरेश गावडे,आयोजक श्रद्धा गणेश मित्र मंडळ कार्यकर्ते खेळाडू उपस्थित होते. प्रथम पारितोषिक २१,०२४ रुपये आणि चषक,द्वितीय ११,०२४ तृतीय ३०२४ रुपये आणि चषक तसेच इतर परितोषके ठेवण्यात आली आहेत.तीन दिवशीय भव्य क्रिकेट स्पर्धा शिवसेनेकडून आयोजित करण्यात आली आहे.यावेळी बाळा गावडे,आबा सावंत,शब्बीर मणियार यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

You cannot copy content of this page