मालवणातील शिबिरात ५२ जणांचे रक्तदान…

*💫मालवण दि.१६-:* सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, स्वराज्य व सेवते आणि साहित्य सहवास यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात महिला व पुरुष अशा एकूण ५२ जणांनी रक्तदान केले. शिबिरात महिलांचा सहभाग लक्षवेधी राहिला. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर व तालुकाध्यक्ष शिल्पा खोत यांच्या संकल्पनेतून आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सिंधु रक्तमित्रच्या तालुकाध्यक्ष शिल्पा खोत, नगरसेवक यतीन खोत, किशोर नाचणोलकर, डॉ. सुमेधा नाईक, साहित्य सहवास संस्थेच्या ऐश्वर्या कोदे, अमित खोत, मंदार गावडे, सायली कांबळी, दत्ता पिंगुळकर, शांती तोंडवळकर, रूपा कुडाळकर, अनुष्का चव्हाण, भूमिका म्हापणकर, दीक्षा गोलतकर, आर्या गावकर, स्वाती तांडेल, दीपा पवार, अल्पेश वराडकर, दीपेश पवार, अश्विनी आचरेकर आदी उपस्थित होते. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पालव, अधिपरीचारिका हेमांगी रणदिवे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता किशोर नांदगावकर, परिचर उल्हास राणे व नंदकुमार आडकर, वाहनचालक नितीन गावकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी उपस्थित असलेल्या बहुतांश महिलांना रक्तदान करायचे होते, मात्र हिमोग्लोबिन कमी व अन्य कारणांनी त्यांना रक्तदान करता आले नाही. ही बाब लक्षात घेता महिलांमध्ये प्रामुख्याने हिमोग्लोबिन वाढवा, यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस शिल्पा खोत यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page