अजय गोंदावळे यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी निवड…

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांची सेवा शक्ती संघर्ष एसटी कामगार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी लक्ष्मण बरागडे, आबा माणगावकर, व्ही. डी. गावडे तर सचिव म्हणून रावजी राणे, यांची निवड करण्यात आली आहे.


भाजपा पुरस्कृत असलेल्या या एसटी कामगार संघाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास श्री.गोंदावळे यांनी व्यक्त केला.त्यांच्या समवेत सहसचिव ए. ए. गावडे, आर. के. जाधव, सल्लागार सी. एन. देशपांडे, राजू ठाकूर, कार्याध्यक्ष बायली तुळसकर, खजिनदार अरुण सरदेसाई, सहखजिनदार सुजल मसुरकर, प्रसिद्धी सचिव मोसीन शेख, संघटक सचिव सुवर्णा जोशी, निलम खरात, विभागीय सदस्य आर. एस. गावकर, आनंद पी. राणे, पी. एस. शशेट्ये, जी. पालयेकर, बी. एस. लातये, सदस्य- एस. एस. परम, ए. व्ही. भिरंडेकर, सारिका महाडगुत, प्रथमेश हेळेकर, आर. यु. सावंत आदींची निवड करण्यात आली.

You cannot copy content of this page