स्थगित ग्रामसभा घेण्यासाठी तारकर्ली ग्रा प विरोधात कोळबकर यांचे उपोषण

२५ मार्चला सभां घेण्याचे बीडीओचे आश्वासन

*💫मालवण दि.१६-:* तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीची गतवर्षी ११ फेब्रुवारी २०२० रोजीची स्थगित झालेली विशेष ग्रामसभा अद्याप पर्यंत प्रशासनाने आयोजित न केल्याने ही ग्रामसभा तातडीने आयोजित करण्याच्या मागणीसाठी तारकर्ली येथील ग्रामस्थ भिवाजी कोळंबकर यांनी आजपासून मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी तारकर्ली ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि. २५ मार्च रोजी घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने स्थगित केले. तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीची दि. ११ फेब्रुवारी २०२० रोजीची विशेष ग्रामसभा स्थगित करण्यात आली होती त्यानंतर कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली होत नसल्याने ग्रामस्थ भिवाजी कोळंबकर यांनी ग्रामपंचायत व गटविकास अधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मात्र ग्रामसभा आयोजित केली गेली नसल्याने प्रशासन ग्रामसभा आयोजित करण्याबाबत चालढकल करीत असून गावच्या विकासाला खीळ घालत असल्याचा आरोप भिवाजी कोळंबकर यांनी करत निषेध व्यक्त स्थगित ग्रामसभा पुन्हा आयोजित करावी म्हणून आज मंगळवारी सकाळी १०:३० वाजल्यापासून मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर भिवाजी कोळंबकर यांनी ग्रामस्थांसह उपोषण सुरू केले होते. कोळंबकर यांनी केलेल्या मागण्यानुसार गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी तारकर्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा २५ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे आदेशीत करत त्याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना सूचित केले आहे, अशा आशयाचे पत्र भिवाजी कोळंबकर यांना दिले. ग्रामसभा आयोजित करण्याबाबतचे हे पत्र अधिकारी संजय गोसावी पी. डी. जाधव यांनी कोळंबकर यांना सुपूर्द केले. या लेखी आश्वासनमुळे कोळंबकर यांनी उपोषण स्थगित केले. फोटोमालवण दि प्रतिनिधी तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीची गतवर्षी ११ फेब्रुवारी २०२० रोजीची स्थगित झालेली विशेष ग्रामसभा अद्याप पर्यंत प्रशासनाने आयोजित न केल्याने ही ग्रामसभा तातडीने आयोजित करण्याच्या मागणीसाठी तारकर्ली येथील ग्रामस्थ भिवाजी कोळंबकर यांनी आजपासून मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी तारकर्ली ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि. २५ मार्च रोजी घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने स्थगित केले. तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीची दि. ११ फेब्रुवारी २०२० रोजीची विशेष ग्रामसभा स्थगित करण्यात आली होती त्यानंतर कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित करण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली होत नसल्याने ग्रामस्थ भिवाजी कोळंबकर यांनी ग्रामपंचायत व गटविकास अधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मात्र ग्रामसभा आयोजित केली गेली नसल्याने प्रशासन ग्रामसभा आयोजित करण्याबाबत चालढकल करीत असून गावच्या विकासाला खीळ घालत असल्याचा आरोप भिवाजी कोळंबकर यांनी करत निषेध व्यक्त स्थगित ग्रामसभा पुन्हा आयोजित करावी म्हणून आज मंगळवारी सकाळी १०:३० वाजल्यापासून मालवण पंचायत समिती कार्यालयासमोर भिवाजी कोळंबकर यांनी ग्रामस्थांसह उपोषण सुरू केले होते. कोळंबकर यांनी केलेल्या मागण्यानुसार गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी तारकर्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा २५ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे आदेशीत करत त्याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांना सूचित केले आहे, अशा आशयाचे पत्र भिवाजी कोळंबकर यांना दिले. ग्रामसभा आयोजित करण्याबाबतचे हे पत्र अधिकारी संजय गोसावी पी. डी. जाधव यांनी कोळंबकर यांना सुपूर्द केले. या लेखी आश्वासनमुळे कोळंबकर यांनी उपोषण स्थगित केले.

You cannot copy content of this page