शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून २० लाख निधी मंजूर..
सावंतवाडी : असनिये येथील श्री देवी माऊली मंदीर ते टेंबवाडी रस्ता मजबुतीकरण करणे कामाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत सन २०२३-२४ २५/१५
लेखाशिर्षकाखाली या रस्त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, सावंतवाडी तालुका संजयगांधी निराधार समितीचे अध्यक्ष गजानन नाटेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनायक दळवी, सरपंच रेश्मा सावंत, ग्रामपंचायत सदस्य दर्शना दामले, भरत सावंत, शाखाप्रमुख राकेश सावंत, विद्या सावंत, लक्ष्मण सावंत, जितेंद्र सावंत, प्रितेश ठीकार, संदेश कोलते, संभाजी कोलते, बाबल सावंत, रुपेश सावंत, सतीश सावंत, विकास सावंत, वैभव सावंत, कृष्णा सावंत, ओंकार सावंत, रोहीत सावंत, सुभाष सावंत, तुकाराम सावंत, प्रशांत ठीकार, नरेंद्र नाईक, बाबुराव सावंत, आनंद ठीकार, प्रेमानंद ठीकार, दुलाजी सावंत, भिकाजी नाईक, सोहम सावंत, शैलेश सावंत, गणपत सावंत, रत्नाकर सावंत आदी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. हे काम मंजूर केल्याबद्दल दीपक केसरकर यांचे असनिये ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत.
