कुडाळ ता.३१-: तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर नाजिक असलेल्या श्री कलेश्वर मंगल कार्यालय येथे उद्या सोमवार १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते १२:३० या वेळेत नोकरी व्यवसाय या विषयावर विनामुल्य मार्गदर्शन वर्ग आयोजित केला आहे.
यावेळी ज्योतिषी महादेव कांबळी हे सर्वांना विनामुल्य मार्गदर्शन करणार आहेत. नेरूर गावातील सर्वांनी उपस्थित राहून या करियर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सर्वेश देसाई यांनी केले आहे.
