भद्रकाली देवीचा रेवंडी सर्जेकोट गावभेट सोहळा संपन्न…

*💫मालवण दि.१६-:* रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली देवीचा रेवंडी- सर्जेकोट गावभेट सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्याच्या निमित्ताने रस्ते सडा रांगोळीने सजविण्यात आले होते. देवीच्या गावभेटीमुळे दोन्ही गावात उत्साहाचे वातावरण होते. यावेळी भाविकांनी त्या त्या ठिकाणी श्रीदेवी भद्रकालीचे स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी रेवंडी येथून श्रीदेवी भद्रकालीची पालखी देव तरंगासह गावभेट सोहळ्यासाठी रवाना झाली. रेवंडीतील विविध देवतांसह सर्जेकोटमधील बारापाचच्या स्थळांना देवीने भेट दिली. यावेळी भाविकांनी त्या त्या ठिकाणी श्रीदेवी भद्रकालीचे स्वागत करत दर्शनाचा लाभ घेतला. गावभेट सोहळ्याच्या निमित्ताने गेले दोन तीन दिवस गावात मंदिरांची साफसफाई, रंगरंगोटी, सजावटीची कामे करण्यात आली. ज्या मार्गावरून देवीची पालखी गावात प्रवेश करते. त्या मार्गावर भाविकांनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या होत्या. या सोहळ्याच्या निमित्ताने गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. सायंकाळी बारापाच स्थळांना भेटी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर भद्रकाली देवीची पालखी पुन्हा रेवंडी गावाकडे मार्गस्थ झाली.

You cannot copy content of this page