जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठीची निवडणूक 24 मार्च रोजी

सिंधुदुर्गनगरी दि.- 16 : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दिनांक 24 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या प्रवर्गासाठी राखीव आहे. अध्यक्ष पद विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असेल तेव्हा त्या विशिष्ट प्रवर्गाची व्यक्ती कोणत्याही निवडणूक विभागातून निवडून आली असली तरी अध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास पात्र राहील. हेच तत्व महिला आरक्षणासाठी लागू राहील. तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांनी दिनांक 24 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वा. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनरी येथे अध्यक्षपदाच्या निवडीच्या बैठकीस उपस्थित रहावे असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कळविले आहे.

You cannot copy content of this page