प्रथमेश तेली ; 12 ते 26 जानेवारीला आयोजन
⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा तर्फे नमो चषक माध्यमातून सांस्कृतिक महोत्सव व क्रिडा स्पर्धेच आयोजन करण्यात आल आहे याबाबतची माहिती भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी आज येथे दिली.
दरम्यान 25 डिसेंबर ते 10 जानेवारी पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन भाजप विधानसभा कार्यालया येथे नोंदणी करायची असून तर 12 जानेवारी ते 26 जानेवारी रोजी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात या स्पर्धा होणार असून यावेळी जिमखाना मैदानावर संमराभला भाजपचे प्रमुख नेते व युवा मोर्चाचे प्रमुख नेते उपस्थितीत राहणार असल्याच देखील श्री. तेली यावेळी सांगितले.
यावेळी सावंतवाडी विधानसभा क्रिडा संयोजक निशू तोरसकर,देवेंद्र शेटकर, सरपंच खोपरल,संदीप बांदेकर युवा मोर्चा बांदा उपाध्यक्ष,विनेश गवस,लवू नाईक,पराशे सावंत आदी उपस्थित होते.
