वैश्य समाज सहकारी पतसंस्था जिल्हा संचालकपदी उमेश वाळके विजयी…

कणकवली तालुका संचालक पदी सुनील कोरगावकर..

⚡कणकवली ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाटच्या संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेश वाळके यांनी ॲड. दीपक अंधारी यांचा पराभव केला. उमेश वाळके यांना 1078 तर ॲड. दीपक अंधारी यांना 376 मते मिळाली. 46 मते बाद झाली. तसेच तालुका संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनील कोरगावकर यांनी दीपक अंधारी यांचा पराभव केला. उमेश वाळके हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख आहेत.

या विजयाबद्दल दोघांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ओरोस येथील शिक्षक पतपेढी येथे ही मोजणी प्रक्रिया पार पडली. दरम्यान कणकवली पटवर्धन चौकात उमेश वाळके व सुनिल कोरगावकर समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

You cannot copy content of this page