पोखरण जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेचा 3 जानेवारीपासून शतक महोत्सव

⚡कणकवली ता.२५-: पोखरण येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नं.१ एकची स्थापना ३ जानेवारी १९२४ रोजी झाली होती .त्या दिवसाला ३ जानेवारी २०२४ रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. अशा या शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम गावच्या ग्रामस्थ, माजी सैनिक, माजी विद्यार्थी यांच्यावतीने 3 जानेवारी ते 7 जानेवारी यादरम्याने भव्यदिव्य करण्याचे योजण्यात आलेले आहे या शतक महोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने शतक महोत्सव समितीची स्थापना झालेली असून या समितीच्या अध्यक्षपदी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शामसुंदर सावंत ,माजी सैनिक विठोबा सावंत यांची उपाध्यक्षपदी तर पोखरण गावचे सुपुत्र आणि विद्यमान केंद्रप्रमुख संजय कदम यांची खजिनदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
यानिमित्ताने विविध उपसमित्याही गठीत करण्यात आलेल्या आहेत.अर्थ समितीचे अध्यक्षपदी अनिल सावंत , सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समिती परी विनया कदम, रंगमंच समितीचे अध्यक्षपदी रघुनाथ सावंत ,प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी सिद्धेश सावंत तर स्वागत समितीचे अध्यक्षपदी गोविंद सावंत यांची नियुक्ती झाली आहे या निमित्ताने या पाच दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सर्व माजी विद्यार्थी ग्रामस्थ या सर्वांनी सहभागी व्हावे असे महोत्सव समितीच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.

सुरुवातीला पोखरण गावचे ग्रामदैवत श्री देवलिंगीरवनाथ यांच्या मंदिरात सुरू झालेली शाळा इयत्ता चौथी पर्यंत एकाच इमारतीमध्ये त्यानंतर सातवीपर्यंतचे वर्ग झाल्यानंतर 1965 च्या दरम्याने पोखरण गावच्या सर्व नागरिकांच्या अथक परिश्रम आणि कष्टातून दुसरी इमारत उभी राहिली ज्या काळामध्ये पारतंत्र असता नाही ज्ञानाची कवाड उघडे करत असताना पोखरण कुसबे ,कुंदे, आब्रड या गावातील शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्यासाठी त्या वेळच्या लोकांनी या शाळेची सुरुवात केली.

You cannot copy content of this page